Saam Impact Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : संभाजीनगर- जळगाव रोडवरील पूर्णा नदीच्या पुलाची दुरुस्ती; दोन्ही बाजूंनी पडले होते मोठे खड्डे

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे येणाऱ्या मार्गावरील पूर्ण नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यामधून लहान चार चाकी वाहनांना जाता येत नसल्याने अडचण निर्माण झाली होती

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरील माणिकनगर (भवन) येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूने मोठं मोठे खड्डे पडले होते. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. शिवाय वाहतुकीची कोंडी देखील होत होती. याबाबत बातमी प्रसारित झाल्यानंतर पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगरकडून (Sambhajinagar) जळगावकडे येणाऱ्या मार्गावरील पूर्ण नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यामधून लहान चार चाकी वाहनांना जाता येत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. यामुळे वाहनाची कोंडी निर्माण होत होती. याबाबत साम टीव्हीने मार्गावरील खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध केली होती. सदरचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार खडबडून (Saam Impact) जागे झाले. यानंतर आज सकाळी बारा वाजेच्या दरम्यान पुलाच्या दोन्ही बाजूच्या असलेल्या खड्ड्यात मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित केला. 

पावसाळ्यात अधिक त्रास 

संभाजीनगर- जळगाव मार्गावरील रस्त्याची समस्या अजूनही कायम आहे. बहुतांश ठिकाणी मार्ग दुरुस्तीचे काम बाकी असल्याने वाहधारकांसाठी समस्या निर्माण होत आहे. हीच परिस्थिती पूर्ण नदीवरील पुलावरची होती. दरम्यान पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजण्याचे काम सांच्या वृत्तामुळे शक्य झाले आहे. आज मुरूम टाकातांना वाहनाची दुरपर्यंत रांग लागलेली होती. वाहनचालकांनी याबद्दल साम टीव्हीचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traditional Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील या 4 मंगळसुत्रांच्या लेटेस्ट डिझाईन्स आणि हे पारंपारिक दागिने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT