Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहून

Sambhajinagar News : पैठण तालुक्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला. तर रविवारी सकाळपर्यंत मागील २४ तासात बीड जिल्ह्यात ४६.१ मिमी पाऊस झाला. जिल्हयातील १८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसात संभाजीनगर जिल्ह्यातील १० मंडळामध्ये आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातल्या ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुले जवळपास ६४० गावांना फटका बसला असून जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड, आडूळ, कडेठण, विहामांडवा परिसरात शेतात पाणी साचून खरीप तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काल बऱ्याच ठिकाणी अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता. आज काही ठिकाणी तो संपर्क पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी ओसरले नसून पूरस्थिती कायम आहे. 

दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता 

दरम्यान पुढील २ दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील १०, जालन्यातील ५, बीडमधील ७, लातुरातील ७, धाराशिव, हिंगोलीतील प्रत्येकी १ तर नांदेड जिल्ह्यातील २ अशा एकूण ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. 

शेतातील कांदा गेला वाहून 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यात शेतांमध्ये पाणी शिरले असून ज्ञानेश्वर वाडी शिवारात शेत वस्तीत ठेवलेला कांदा वाहून गेला आहे. जोरदार पावसामुळे कांदा गेला वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हा कांदा जमा करण्याची धडपड शेतकऱ्याची सुरु असली तरी पाण्यात भिजलेला कांदा सडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: परभणीत 7 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करताय? तर मग थांबा; 'या' प्रसिद्ध ४ ठिकाणांवर प्रशासनाचे कडक निर्बंध

Politics : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; शिंदेसेनेत जाताच महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT