Marathwada Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Water Crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या पोहोचली 2 हजाराच्या वर; पावसाळा सुरू झाला तरी भीषण पाणी टंचाई

Sambhajinagar News : गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची समस्या सर्वत्र उद्भवली आहे. पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आणि त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाचे सावट

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : चांगला पाऊस न झाल्याने मराठवाड्यात अधिक पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आताही मराठवाड्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे पडले असल्याने भीषण पंचाची जाणवत आहे. यामुळे सध्या मराठवाड्यात २ हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची समस्या सर्वत्र उद्भवली आहे. पावसाने मराठवाड्याकडे (water Scarcity) पाठ फिरवली आणि त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाचे सावट पसरले. बहुतांश मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प हे देखील आता कोरडे ठाक पडले तर विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीला संपूर्ण मराठवाड्यात २ हजार १५ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून आतापर्यंत ४४८ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आले आणि त्यातून उपसा करत 1 हजार 394 गावे आणि 587 वाड्यांची तहान भागविली जात आहे. 

दरम्यान छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यात सर्वाधिक ७३६ टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. अशातच संपूर्ण मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे राज्यात मान्सून दाखल झाला असून आता मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. किमान चांगला पाऊस पडल्यास पाण्याची समस्या मिटू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-US Conflict: आखाती युद्धात पाकिस्तान होरपळला; फुटला महागाईचा बॉम्ब

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये वृक्ष कत्तलीचा कुंभ; कुंभमेळ्यासाठी हजारो वृक्षांचा बळी, पर्यावरणप्रेमींचा आक्रोश

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

SCROLL FOR NEXT