Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : नंदीग्राम एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला, रेल्वे रुळावर ठेवले होते सिमेंटचे पोल अन् दगड; जालन्यातील धक्कादायक प्रकार

Sambhajinagar News : लाडगाव- करमाड शिवारातील उड्डाणपुलाखालून जातांना चालकाला रुळावर सिमेंटचे ढापे, सिमेंटचे दगड ठेवल्याचे निदर्शनास आले

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : देशभरात रेल्वे रुळावर सिलिंडर, खांब, दगड ठेवून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान छत्रपती संभाजीनगरात अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार लाडगाव- करमाड शिवारात घडला. मात्र सुदैवाने या मार्गावरून जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला आहे. 

नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री छत्रपती संभाजीनगरहून (Sambhajinagar News) जालन्याकडे रवाना झाली. हि एक्सप्रेस रात्री १ वाजता लाडगाव- करमाड शिवारातील उड्डाणपुलाखालून जातांना चालकाला रुळावर सिमेंटचे ढापे, सिमेंटचे दगड ठेवल्याचे निदर्शनास आले. यावेळी रेल्वे ताशी १०० किमीचा वेग असल्याने ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने (Railway) दगडांना उडविले. जोरदार आवाज झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. 

दगड ठेवलेल्या जागेपासून २०० मीटरवर जाऊन ही रेल्वे थांबली. धडकेमुळे रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला सिमेंटच्या दगडांचे तुकडे पडले होते. याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती देऊन रेल्वे पुढे रवाना झाली.अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, एसडीपीओ विष्णू भोये यांच्यासह करमाड पोलिस, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी रेल्वेचे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर कैलास दास यांनी दिलेल्या फिर्यादीवर करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रेल्वे ताशी १०० किमीच्या वेगाने धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

Juices For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे?

Dahi Bhindi Recipe : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

SCROLL FOR NEXT