Marathwada Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी; ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Sambhajinagar News : संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे ६८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात काही भागात मान्सूनचे देखील आगमन झाले असून. मागच्या चोवीस तासात मराठवाड्यातील ६८० गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर ३४ महसूल मंडळांत जोरदार पाऊस पडल्याने पावसाळ्यापूर्वीच दणादण उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. यामध्ये संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे ६८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मे महिन्यातील १६ दिवस पावसाची नोंद 

दरम्यान मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये १७ महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत. तर मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मे मधील २८ पैकी १६ दिवस पावसाची नोंद झाली असून मागील २५ वर्षात मे महिन्यात इतक्या दिवस पाऊस बरसण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठवाड्यात यंदा मे महिन्यात सरासरी १७७ मिमी पाऊस पडला असून २७ ते २८ मे या दोन दिवसात सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला आहे.

जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस 

दरम्यान विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला आहे. या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे पुर आल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT