Sambhajinagar CIDCO Police Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar CIDCO Police : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; संभाजीनगर सिडको पोलिसांची कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Sambhajinagar News : गुटखा, तंबाखू विक्रीस बंदी घालण्यात आली आहे असे असताना देखील गुटख्याची छुप्या पद्धतीने वाहतूक करत पुरवठा करण्यात येत असून त्याची विक्री केली जाते अर्थात गुटख्याची सर्रासपणे विक्री

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : गुटखा विक्री करण्यास बंदी असताना देखील गुटख्याची वाहतूक व विक्री छुप्या पद्धतीने सर्रासपणे सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात असलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला असून पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

गुटखा, तंबाखू विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील गुटख्याची छुप्या पद्धतीने वाहतूक करत पुरवठा करण्यात येत असून त्याची विक्री देखील केली जात असते. अर्थात गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे पाहण्यास मिळत असताना यावर पूर्णतः अंकुश लावण्यात प्रशासनाला अपयश मिळत आहे. याचाच फायदा घेत गोडाऊनमध्ये साठवणूक करून गुटखा ठेवला जात असतो. संभाजीनगरच्या सिडको परिसरात देखील गोडाऊनमध्ये अशाच प्रकारे साठवणूक करण्यात आली होती.  

पोलिसांनी छापा टाकत कारवाई 

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एन- ११ परिसरात एक व्यक्ती त्याच्या गोडाऊनवर चार चाकी वाहनातून सुगंधित तंबाखू आणि गुटखा पान मसाला घेऊन येत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून विशेष पथकाने सदरच्या गोडाऊनवर छापा टाकत कारवाई केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला आहे. 

१३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत तिघे ताब्यात 

पोलिसांना या ठिकाणी ७ लाख ५९ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल आणि ५ लाख ६० हजार रूपये किमतीची चार चाकी असा एकूण १३ लाख १९ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत लड्डा, सुनील शेंडगे आणि ओम झांबरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस तपास सिडको पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT