Ghati Hospital Saam tv
महाराष्ट्र

Ghati Hospital : 'घाटी'त घोटाळा! हॉस्पिटलचा ऑन पेपर कर्मचारी वेगळा, ऑन ड्युटी तिसराच!, अजब कारनामा उघड!

Sambhajinagar News : रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कामासाठी परस्पर बाहेरचे लोक ठेवल्याची माहिती आता समोर आली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी झटकून आपले काम दुसऱ्याला करण्यास लावण्यासाठी बाहेरचे व्यक्ती कामावर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात समोर आला आहे. रुग्णालयातील तब्बल ११ कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. 

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या (Ghati Hospital) एक्स रे विभागातील विनयभंग प्रकरण केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर रुग्णालयातील सदरची धक्कादायक बाब समोर येत आहे. यात रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कामासाठी परस्पर बाहेरचे लोक ठेवले आहेत. विशेष म्हणजे महिला रुग्णाच्या वार्डात चक्क महीला कर्मचाऱ्याऐवजी बाहेरच्या पुरुषाकडून काम करून घेतले जात आहे. 

१२ हजाराच्या पगारावर ठेवले रुग्णालयात 

एक्स रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला टॉप काढायला लावून विनयभंग केल्यानंतर ही सगळी गोपनीय माहिती समोर आली आहे. घरी बसून ४० हजार घ्यायचे आणि बाहेरच्या लोकांना १२ हजार रुपये हातात टेकवायचे; असा या कामचुकार कर्मचाऱ्यांचा फंडा असल्याची माहिती समोर आली आहे. महिन्यातून एकदा कार्यालयात येऊन हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करायची, असा हा प्रकार आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पुण्यात थेट अजित पवार विरुद्ध भाजप; स्थानिक निवडणुकांमध्ये रंगणार थरारक लढत

Maharashtra Live News Update:कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Shocking : धक्कादायक! १४ वर्षीय मुलाची ४० वर्षीय महिलेवर वाईट नजर; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच तिला संपवलं

Thane-Dombivli: डोंबिवली-ठाणे प्रवास ३५ मिनिटांनी होणार कमी; या ठिकाणी बांधणार चारपदरी उड्डाणपूल, मेगाप्लान ठरला

पोटाचे टायर्स कमीच होत नाही? दुपारच्या आधी करा फक्त ३ गोष्टी, वजन घटणारच

SCROLL FOR NEXT