Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

ZP School Teacher : जिल्हा परिषद शाळेतील १२०० शिक्षकांवर शिस्तभंग कारवाई; मुख्यालयी राहत नसल्याने वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस

Sambhajinagar News : शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी १ जानेवारीला बैठक घेऊन मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र बरेच शिक्षक हे रोज अपडाऊन करत असतात. अशा प्रद्धतीने गावी मुख्यालयी राहत नसलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार २५३ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली होती. तर आता या सर्व शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.  

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेल्या गावी राहणे बंधनकारक असते. तर जे शिक्षक राहत नाही त्यांना घरभाडे भत्ता देण्यात येत असतो. मात्र संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आदेश दिल्यानंतर शिक्षक मुख्यालयी राहत नव्हते. अशा १ हजार २५३ शिक्षकांचे घरभाडे प्रशासनाने रोखले होते. तरीही शिक्षक ऐकत नसल्याने यापुढ वेतनवाढ रोखणार असल्याच्या कारणे दाखवा नोटिसा शिक्षण विभागाने बजावल्या आहेत. 

आमदार प्रशांत बंब यांची तक्रार 

शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत; अशी तक्रार खुलताबाद- गंगापूर मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२२ पासून खुलताबाद, गंगापूर तालुक्यातील १२५३ मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. तरीही हे शिक्षक मुख्यालयी राहण्यासाठी तयार नाहीत. त्याअनुषंगाने २९ जुलै रोजी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या सर्व १२५३ शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

एक वार्षिक वेतनवाढ रोखली 

दरम्यान खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आणि मुख्यालयी राहत नसलेल्या १ हजार २५३ शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर या शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी तात्पुरती बंद करण्यात का येऊ नये, अशा नोटिसा २९ जुलै रोजी बजावल्या आहेत. या शिक्षकांचा घरभाडे भत्ता ८ सप्टेंबर २०२२ पासून बंद करण्यात आला होता. मात्र, तरीही ते मुख्यालयी राहण्यास तयार नव्हते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT