Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : धक्कादायक...दोन महिन्याच्या मुलीला शौचालयात सोडून आई- वडील फरार; देवगिरी एक्सप्रेसमधील प्रकार

Sambhajinagar News : शौचालयात आढळून आलेली मुलगी हि साधारण एक ते दीड महिने वयाची आहे. रेल्वेतून प्रवास करताना रात्रीच्या सुमारास मुलीला शौचालयात बेवारस अवस्थेत सोडून तिच्या कुटुंबाने पोबारा केला.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे प्रवासादरम्यान मुलीला शौचालयात टाकून देत जन्मदात्या आई- वडिल तेथून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या शौचालयातून मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांकडून त्या मुलीच्या आई- वडिलांचा शोध घेतला जात आहे.     

लिंगमपल्ली ते मुंबई जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधे (Railway) मध्यरात्री हा प्रकार समोर आला आहे. शौचालयात आढळून आलेली मुलगी हि साधारण एक ते दीड महिने वयाची आहे. रेल्वेतून प्रवास करताना रात्रीच्या सुमारास मुलीला शौचालयात बेवारस अवस्थेत सोडून तिच्या कुटुंबाने पोबारा केला. (sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात हा प्रकार रेल्वेत प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मनमाड येथे गाडी पोहचताच पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

दरम्यान गाडीमध्ये हे मुल कोणाचे आहे का? याबाबत पोलिसांनी शोध घेतला. परंतु कोणीही त्याची जबाबदारी घेतली नसल्याने अखेर रेल्वे पोलीस ठाणे मनमाडमध्ये हे प्रकरण दाखल करण्यात आले. त्याबाबत माहिती पत्रक काढून पोलिसांकडून बाळाच्या कुटबियांचा शोध आता घेतला जात आहे. दरम्यान मुलगी सुखरूप असल्याची माहिती रेल्वे पोलिसांची दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT