Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : संभाजीनगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण, दोघे संशयित; आरोग्य विभाग सतर्क

Sambhajinagar News : संभाजीनगर शहरात गेल्या तीन वर्षात आलेल्या डेंगू, मलेरियाचे रूग्ण आढळून आलेल्या १६३ अती जोखमीच्या वसहतीवर महापालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरु झाल्यानंतर लागलीच डेंग्यूची साथ पसरण्यास सुरवात झाली आहे. संभाजीनगर शहरात देखील डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर अन्य दोघेजण संशयित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून साथ रोग निर्मूलन जनजागृती कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. 

पावसाळा सुरू झाला असल्याने साथ रोगांचा धोका आता वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) शहरात गेल्या तीन वर्षात आलेल्या डेंगू, मलेरियाचे रूग्ण आढळून आलेल्या १६३ अती जोखमीच्या वसहतीवर महापालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान जून महिन्यात मलेरिया आणि (Dengue) डेंगू १ रुग्ण आणि २ संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग आता चांगलाच सतर्क झाला असून घरोघरी जाऊन साथ रोग निर्मूलनाची जनजागृती करीत आहे. 

फवारणीच्या कामाला सुरवात 

आरोग्य विभागाकडून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यासोबत साथ निर्मूलनासाठी फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने डासांचे उत्पत्ती होणारे स्थाने नष्ट करणे, नागरिकांना घर स्वच्छ आणि कोरडा दिवस पाळणे, औषध फवारणी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT