Sambhajinagar News  Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : पार्सल उशिराने दिले म्हणून डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण; सिडको पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील जितेंद्र नावाचा तरुण हा वृत्तपत्र विक्रेता आहे. कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून वृत्तपत्र विक्री केल्या नंतर दिवसा फ्लिपकार्ट कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूचे पार्सल उशिराने आणले म्हणून डिलिव्हरी बॉयला एका पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडली आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय हा जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) शहरातील जितेंद्र नावाचा तरुण हा वृत्तपत्र विक्रेता आहे. कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून वृत्तपत्र विक्री केल्या नंतर दिवसा फ्लिपकार्ट कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. दरम्यान या साईडवरून सिडको पोलीस ठाण्यातील कर्मचारी जीवन शेजवळ यांनी वास्तूचे बुकिंग केले होते. सोमवारी त्याच्याकडे एक पार्सल आले होते. ते पार्सल सिडको पोलीस ठाण्यात असलेल्या शेजवळ या कर्मचाऱ्यांचे होते. काल पाऊस असल्यामुळे पार्सल देण्यासाठी जितेंद्र याला थोडा वेळ लागला. त्या दरम्यान सात- आठ कॉल पोलीस कर्मचाऱ्याने जितेंद्रला केले. त्यावेळी फोनवरून एकेरी शब्दाचा वापर जितेंद्रने केला म्हणून पोलिसाने काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर जितेंद्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अगोदर मेडिकल करा, त्यानंतर या म्हणून घरी पाठवले. ही माहिती त्यांनी प्रसार माध्यमाला कळवल्यानंतर पोलीस मात्र खडबडून जागे झाले.

पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल 

पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या मारहाणीत डिलिव्हरी बॉयच्या सर्व अंगावर जखमा होऊन अंग सुजले आहे. तसेच ओठ फाटले असून डोक्यात देखील गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी आता सिडको पोलीस ठाण्यामध्ये त्या कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT