Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Milk Price : दुध दरवाढीसाठी काँग्रेसचा रास्तारोको; फुलंब्रीत संभाजीनगर- जळगाव महामार्गावर दूध ओतून केला निषेध

Sambhajinagar News : राज्यात आतापर्यंत दूध दर वाढीच्या मागणीसाठी शेतकरी, शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले आहेत.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
: दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला चांगला दर मिळावा यासाठीची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहेत. यानंतर याच मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर दूध ओतून यावेळी सरकारचा निषेध करत महामार्ग रोखून धरला. 

राज्यात आतापर्यंत दूध दर (Milk Price) वाढीच्या मागणीसाठी शेतकरी, शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले आहेत. यानंतर दूध दरवाढीच्या मागणीसाठी काँग्रेस (Congress) आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा; यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेस आक्रमक झाले आहे. सरकारने दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला सरसकट ४० रुपये भाव तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

दूध ओतून केला निषेध व्यक्त

दरम्यान फुलंब्री येथे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्ग रोखून धरला. तर सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दूध ओतून निषेध करण्यात आला. दरम्यान यावेळी छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT