sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : घर बांधकामावर पाणी मारताना अनर्थ घडला; विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

sambhajinagar News : ढाकेफळ येथील साबेर शेख हा गावातील तुकाराम हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. यामुळे त्याला सुट्या असल्याने तो घरात कामात मदत करत होता

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने रोज नियमित बांधकामावर पाणी मारण्यासाठी जाणाऱ्या मुलासोबत दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या ढाकेफळ येथे बांधकाम सुरु असलेल्या नवीन घरावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून १६ वर्षीय मुलाचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ढाकेफळ या गावातील साबेर शाकेर शेख (वय १६) असे घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. ढाकेफळ येथील साबेर शेख हा गावातील तुकाराम हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. यामुळे त्याला सुट्या असल्याने तो घरात कामात मदत करत होता. त्यानुसार नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने तेथे जाऊन बांधकामावर पाणी मारायचा. 

पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने अनर्थ घडला 

दरम्यान नवीन घराचे गावात बांधकाम सुरू असल्याने नेहमीप्रमाणे साबेर हा शनिवारी सकाळी देखील बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला होता. या दरम्यान पाणी मारण्यासाठी लागलेल्या मोटारमुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला पाणी मारताना जोराचा विजेचा धक्का बसून तो जागेवरच कोसळला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

यानंतर कुटुंबियांनी साबेर याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घरातील कर्त्या तरूण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर घडल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT