Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; दहा ते पंधरा लाख रोख रक्कम जळून खाक

Sambhajinagar News : एटीएम मशीन २ चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरमुळे एटीएमला आग लागली होती

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये चोरट्यांनी एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र गॅस कटरने एटीएम फोडल्यामुळे मशीनमधले दहा ते पंधरा लाख जळून खाक झाले आहेत

छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) माळीवाडामध्ये हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेले एटीएम मशीन २ चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरमुळे एटीएमला (ATM) आग लागली होती. यामुळे आगीत मशीनमधील १० ते १५ लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

शिवाय चोरट्यानी एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फोडण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु आजूबाजूच्या व्यक्तींना जाग आल्याने चोरट्याने त्या ठिकाणाहून पलायन केले. दरम्यान हा सगळा प्रकार सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला आणि त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत (Police) पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT