Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : संभाजीनगरात सशस्त्र दरोडा; गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

Sambhajinagar News : पोलिसांना थेट आव्हान देत दरोडेखोरांनी शहरातील सातारा परिसरात धुमाकूळ घातला. घरात घुसून कुटुंबियांच्या गळ्यावर चाकू ठेवून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : चोरट्यांचा भरवस्तीत धुमाकूळ सुरु असल्याने पाहण्यास मिळत आहे. यातच छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास सातारा परिसरात कुटुंबातील सदस्याला गळ्याला चाकू लावून घरातील दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. घटनेत चोरटे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसात वाळूज, पंढरपूर भागात घडलेल्या घटना ताज्या असताना पोलिसांना थेट आव्हान देत दरोडेखोरांनी शहरातील सातारा परिसरात धुमाकूळ घातला. घरात घुसून कुटुंबियांच्या गळ्यावर चाकू ठेवून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

भर पावसात धुमाकूळ 

दरम्यान मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू असताना ६ दरोडेखोरांनी मंकी कॅप घालून आले. हातात कोयता, चाकू, तलवार, टॉमीसारखे, फावड्याचा दांडा, लोखंडी कटोनी शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी नीलेश बागूल यांच्या बंगल्याचे चॅनल गेट दरोडेखोरांनी तोडले. यानंतर घरात प्रवेश करत बाप-लेकाच्या गळ्याला चाकू लावून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने लुटन पसार झाले.  

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दरम्यान भर पावसात या दरोडेखोरांनी चोरी केली. मंकी कॅप घालून आलेले सहा सशस्त्र दरोडेखोर घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. मात्र घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Thursday Horoscope : हवे तसे यश मिळेल, ५ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: अमरावती शहरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

Monsoon Update: राज्यासाठी पुढचे ४ ते ५ दिवस महत्वाचे, पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे हादरलं ! एका घरात आढळले आईसह दोन मुलांचे मृतदेह

SCROLL FOR NEXT