Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील ९० टक्के होर्डिंग धोकादायक; मनपाने दिलेल्या नोटीसला एजन्सीचा ठेंगा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागात उंच उंच इमारतीवर १५ एजन्सीमार्फत मोठे मोठे होर्डिंग उभे केले आहेत.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून निष्पाप १४ जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सध्या स्थितीला संभाजी नगर शहरातील ९० टक्के होर्डिंग हे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर येत आहे. 

छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) शहरातील विविध भागात उंच उंच इमारतीवर १५ एजन्सीमार्फत मोठे मोठे होर्डिंग उभे केले आहेत. यातील काही इमारतीवर क्षमतेपेक्षा मोठे होर्डिंग आणि मोबाईल टावर सुद्धा आहेत. दरम्यान घाटकोपरच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करा; अन्यथा संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल केला जाईल. असा कडक इशारा महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे.

३१ मार्चलाच संपली मुदत 

संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी असलेल्या होर्डिंगपैकी ९० टक्के होर्डिंग धोकेदायक आहेत. या होर्डिंगची मुदत ३१ मार्चलाच संपली होती. त्यानुसार मनपाने नोटीस बजावूनही संबंधित एजन्सीनी होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिटला ठेंगा दाखवल्याचं समोर आले आहे. यामुळे संभाजीनगर शहरात (Ghatkopar) घाटकोपर सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : ५ राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार; धन, सुख,समृद्धीचा वर्षाव होणार, वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

SCROLL FOR NEXT