Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाकडून अत्याचार; खासगी क्लासमधील धक्कादायक प्रकार

Crime News Sambhajinagar: दीड वर्षापूर्वी रांजणगाव येथील एका खासगी शाळेत शिकवत होता; परंतु गैरकृत्यांमुळे त्याला शाळेतून काढून टाकले होते. नंतर त्याने टॉपर क्लासेस नावाने खासगी शिकवणी सुरू केली होती

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : शाळांना सुट्या असल्याने या सुटीच्या कालावधीत मुलांना खासगी शिकवणी लावलेली होती. त्यानुसार तिघे भाऊ- बहीण रोज शिकवणीसाठी जात होते. मात्र याठिकाणी शिकविणाऱ्या शिक्षकाने दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून बाथरूममध्ये अत्याचार केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे उघडकीस आला आहे. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांनी शिक्षकाला चॅनलचा चोप दिला आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे सदर घटना उघडकीस आली असून पीडित मुलगी खासगी शाळेत इयत्ता चौथीत शिकते. दरम्यान दीड वर्षापासून पीडित मुलगी तिच्या दोन भावांसह सुभाष जाधव याच्याकडे खासगी क्लास लावला होता. तिघे बहीण- भाऊ रोज दुपारी ४ ते ६ पर्यंत दरम्यान ट्यूशनसाठी जात होते. सुभाष जाधवने ट्यूशनच्या बाथरूममध्ये घाणेरडे व्हिडीओ दाखवून मुलीवर वारंवार अत्याचार केला. 

मुलीने सांगितली आपबिती 

दरम्यान शनिवारी ट्यूशनहून परतल्यावर पीडित मुलगी पुन्हा ट्युशनला जाणार नाही, म्हणून रडू लागली. यावेळी आईने जवळ घेऊन विचारले असता मुलीने आपबीती सांगितली. कोणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या घरच्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही जाधव याने दिल्याचे मुलीने सांगितले. तर दोन्ही मुलांना विचारले असता, त्यांनीही जाधव सर रोज तिला बाथरूममध्ये घेऊन जात असल्याचे सांगितले.

गैरकृत्यामुळे शाळेतून टाकले काढून 

दरम्यान घडलेल्या प्रकाराने पालक व नातेवाईक संतप्त झाले होते. यानंतर त्यांनी सुभाष जाधव यास चांगलाच चोप दिला. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स.पो.नि. सुषमा पवार तपास करीत आहेत. दरम्यान सुभाष हा दीड वर्षापूर्वी रांजणगाव येथील एका खासगी शाळेत शिकवत होता; परंतु गैरकृत्यांमुळे त्याला शाळेतून काढून टाकले होते. नंतर त्याने टॉपर क्लासेस नावाने खासगी शिकवणी सुरू केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT