Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य; रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा चौक ते कोकणवाडी दरम्यान पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणारी एक तरुणी रिक्षात जात असताना हा सगळा प्रकार घडला होता

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारास राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचे पडसाद उमटत आहेत. अशात रिक्षा चालकांकडून विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संशयित पाच दिवसांपासून फरार असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील बाबा चौक ते कोकणवाडी दरम्यान पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणारी एक तरुणी रिक्षात जात असताना हा सगळा प्रकार घडला होता. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत घडल्याप्रकाराबाबत तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार (Crime News) झाला होता. दरम्यान २५ जून रोजी दिल्ली गेट परिसरात घडलेल्या घटनेमध्ये हा समीर बाबा हा अग्रस्थानी होता. कारागृहातून परत आल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनी समोर त्यानं हे कृत्य केलं होतं.

तुला पैसे लागतात का? असे म्हणत या रिक्षा चालकाने विद्यार्थिनी समोर कपडे काढून अश्लील कृत्य केले. मागील पाच दिवसांपासून फरार असलेल्या रिक्षा चालकाला अखेर सहाव्या दिवशी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. समीर बाबा पठाण असं या विकृत रिक्षा चालकाच नाव असून वेदांत नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT