Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : दुचाकीचा धक्का लागल्याने वाद; टोळक्याकडून कुटुंबावर हल्ला, दोनजण जखमी 

Sambhajinagar News : संभाजीनगर शहरातील आकाशवाणीजवळील एका दुकानात विशाल पिठले हा कामाला आहे. तो नेहमी प्रमाणे रात्री काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला होता. याच वेळी अनिकेत आणि त्याचे मित्र कैलासनगर येथील रस्त्यावर उभे होते.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाचा एका जणाला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून सोमवारी दोन गट आपसात भिडले. भांडण एवढे विकोपाला गेले की, एका टोळक्याने थेट चाकू, कोयते बाहेर काढत हल्ला चढविला. यात एकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. हि घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगरात परिसरात घडला असून या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संभाजीनगर शहरातील आकाशवाणीजवळील एका दुकानात विशाल पिठले हा कामाला आहे. तो नेहमी प्रमाणे रात्री काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला होता. याच वेळी अनिकेत आणि त्याचे मित्र कैलासनगर येथील रस्त्यावर उभे होते. यावेळी विशाल कडून या टोळक्यातील एकाला दुचाकीचा धक्का लागला. दुचाकींचा धक्का लागल्याने टोळक्यातील तरुणांना याचा राग आला. त्यांनी विशालला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. 

विशाल व टोळक्यातील तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून उद्भवलेला वाद बघता बघता वाढला. हे प्रकरण हाणामारी पर्यंत गेले. यावेळी अनिकेत, रोहन आणि त्यांच्या मित्रांनी चाकू, कोयते हाती घेत विशाल पिठले यांच्या कुटुंबावर हल्ला केला. यात विशाल आणि रमेश हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघं जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात विशाल याच्या डोक्याला मार लागला असून तीन टाके पडले आहेत.

हा राडा कैलासनगर येथील भर रस्त्यावर झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्यांमध्ये अनिकेत आणि रोहन यांच्यासह ७ ते ८ जणांचा समावेश आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र, जुन्या वादातून हा राडा झाल्याचे जिन्सी पोलिस सांगत आहेत. जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT