sambhajinagar corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : मोठ्या थकबाकी धारकांना जप्तीच्या नोटीस; मनपाकडून ८६ कोटी १३ लाखांची वसुली

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये तिजोरीत आले पाहिजे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : कर थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी संभाजीनगर महापालिकेने नियोजन आखले आहे. आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट ठेवत शहरातील मोठ्या थकबाकीदारांना नोटीस देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील पाच महिन्यात मालमत्ता कर व पाणीपट्टीतून ८६ कोटी १३ लाखांची वसुली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये तिजोरीत आले पाहिजे; असे नियोजन आखले आहे. या दृष्टीने नियोजन देखील केले आहे. त्यामुळे १ एप्रिल पासून मालमत्ता कर पाणीपट्टी आणि थकबाकीवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. त्याबरोबरच मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना आता जप्तीच्या नोटीस देण्यास सुरुवातही केली आहे. नोटीस बजावत थकबाकी भरण्याचा अल्टिमेटम देण्यात येत आहे. यामुळे काही थकबाकीदारांकडून कराची रक्कम भरली जात आहे. 

नवीन मालमत्ता करांचे देखील सर्व्हेक्षण 

मागील ५ महिन्यात प्रशासनाने ७३ कोटी ७१ लाख रुपये मालमत्ता करातून तर १२ कोटी ४२ लाख रुपये पाणीपट्टीवरच्या माध्यमातून वसूल केले. दरम्यान नवीन मालमत्तांचे देखील आता सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यासाठी ३५ कनिष्ठ अभियंते सर्वेक्षणासाठी नियुक्त केले आहेत. तर थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT