Sambhajinagar Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : लग्नानंतर अघटित घडलं, ३५ जणांचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या ट्रकला भीषण अपघात

Sambhajinagar Accident News : संभाजीनगरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला. एका महिलेचा मृत्यू झाला असून महिला, मुलांसह अनेक प्रवासी जखमी झाले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Alisha Khedekar

  • लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटून भीषण अपघात

  • एका महिलेचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

  • चालकाला डुलकी लागणे हे मुख्य कारण

  • पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

संभाजीनगरमध्ये ३५ जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना सिल्लोड-भराडी रस्त्यावरील आंबा फाट्याजवळ घडली असून या घटनेनंतर कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातून श्रीरामपूरकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन आयशर टेम्पो येत होता. २० फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो सिल्लोड-भराडी रस्त्यावरील आंबा फाट्याजवळ वीज खांबाला धडकून उलटला. अपघाताच्या वेळी टेम्पोमध्ये महिला, वृद्ध आणि मुलांसह सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते.

या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रेखाबाई वसंत गोसावी यांचा मृत्यू झाला आहे. तर सविता गोसावी (वर्षे ४०), सरुबाई गोसावी (वर्षे ५०),वसंताबाई कोळी (वर्षे ६५), ममता कोळी (वर्षे ११), साहिल सपकाळ (वर्षे १३) , पुरुषोत्तम तायडे (वर्षे ११), प्रमिलाबाई गोसावी (वर्षे ५५) हे जखमी झाले आहे.

ज्यावेळी अपघात झाला, त्याच वेळी पोलिसांची गस्त सुरू होती. वीज खांबाला धडक बसल्यामुळे तारा तुटून स्पार्किंग होत होती. पोलीस हवालदार रवींद्र ठाकरे, भिकन सुतके आणि यतीन कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि लाकडी काठीच्या सहाय्याने विजेच्या तारा बाजूला केल्या, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहनातील ३५ प्रवाशी थोडक्यात वाचले, मात्र एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर..

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT