Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पडल्याने मुलाचा मृत्यू; ऊस तोडणीच्या कामासाठी जाताना घडली घटना

Sambhajinagar News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पडल्याने मुलाचा मृत्यू; ऊस तोडणीच्या कामासाठी जाताना घडली घटना

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : ऊस तोडणीच्या कामासाठी परिवार आपले सर्व सामान ट्रॅक्टरमध्ये घेऊन मार्गस्थ झाले होते. मात्र या परिवारावर (Sabhajinagar) अर्ध्या रस्त्यावरच दुःखाचा डोंगर कोसळला. सामान ठेवलेल्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या एक १४ वर्षीय मुलगा खाली पडला. यात त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.  (Maharashtra News)

ऊस तोडणीच्या कामासाठी ऊसतोड कामगार इकडून तिकडे जात असतात. यात त्यांना आपला संपूर्ण संसारोपयोगी साहित्य देखील न्यावे लागत असते. या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जामगाव येथील साखर कारखान्याच्या (Sugar Factory) ऊसतोडणीसाठी कुटुंब रवाना झाले होते. मात्र कारखान्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच परिवारावर आक्रोश करण्याची वेळ आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारखान्याच्या ठिकाणी कुटुंबासह जाताना ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून १४ वर्षीय दीपक नवनाथ मोरे याचा मृत्यू झाला. ही घटना लासुर गंगापूर मार्गावरील सिद्धनाथ वाडगाव येथे घडली. या घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून अपघातातील ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT