Sambhaji Raje and Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

''माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीये, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील''

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी झालेल्या चर्चेत शिवसेनेकडून संभाजी राजेंनी काही अटी घालण्यात आल्या होत्या

संभाजी थोरात

कोल्हापूर: राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण सुरु आहे. सहावी जागा ही शिवसेनेला असणार आहे परंतु त्याचा उमेदवार कोण असेल याबाबत अजून काही ठोस नाव समोर येत नाहीये. छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांचे नाव शिवसेनेकडून (Shivsena) चर्चेत आहे, परंतु त्याना शिवबंधन बांधावे लागेल अशी अट शिवसेनेकडून घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी झालेल्या चर्चेत शिवसेनेकडून संभाजी राजेंना काही अटी घालण्यात आल्या होत्या त्या संभाजी राजेंनी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करावे अशी मागणी केली आहे. यावरच माध्यमांशी बोलताना संभाजी राजे म्हणाले माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे ते त्या प्रमाणे निर्णय घेतली असा मला विश्वास आहे. छत्रपती घराण्याचा सन्मान ते करतील अशी मोजकिच प्रतिक्रिया संभाजी राजेंनी दिलेली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजी राजेंच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना ते म्हणाले की आम्ही छत्रपती घराण्याचा मान ठेवूनच त्यांनी उमेदारी ऑफर केली होती. राज्यसभेवर जाणार सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल असेही राऊत म्हणाले. छत्रपती घराण्याचा सन्मान राखला जातो. तिकीट आणि सन्मान याला जोडायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा सन्मान सर्वच करतात अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Congress Protest Live Update : भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर केले आंदोलन

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून पाणी कपात लागू; 'या' दिवशी राहणार पाणी बंद ? वाचा

SCROLL FOR NEXT