Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

'ज्या मराठा समाजाला हिणवलं...', छत्रपती संभाजीराजे यांनी केली संजय राऊतांची कानउघाडणी

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांची कानउघाडणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठं वादंग उठलं आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चा दाखवताना संजय राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ शेअर केला. यावरुन छत्रपती संभाजीराजे यांनी संजय राऊत यांची कानउघाडणी केली आहे.

संजय राऊत यांनी 2017 साली मुंबई येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्वीट करत हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा असल्याचा दावा केला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांची कानउघाडणी केली आहे.  (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखवण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा.

मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ वापरल्यामुळे मराठा समाजकडून संजय राऊत यांच्यावर उद्या शिवाजी पार्क येथे गुन्हा नोंद व्हावा, यासाठी मराठा मोर्चा मंडळ सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क पोलीस स्टेशन येथे जाणार आहे.

संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करा

ज्या मोर्चामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला तो मोर्चा जणू आपलाच असल्याचं संजय राऊतांनी दाखवलं. अशा प्रकारचं वाईट कृत्य संजय राऊत यांनी केलं. माझी मागणी आहे की संजय राऊत यांनी मराठा समजाची माफी मागवी, तुम्ही मराठा क्रांती मोर्चाची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. माझी तर उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे की संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

Ajit Pawar Death: पुरावे असताना कारवाई का नाही? मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Maharashtra Live News Update: डोंबिवली स्टेशनवर थरारक क्षण; लोकल ट्रेनमध्ये चढताना तरुण पडला

Vastu Tips For Holi: होळीच्या आधीच घरातून या 5 वस्तू बाहेर काढा, अन्यथा नंतर होईल मोठा त्रास

Viral Video: कॅबमधील इमर्जन्सी बटन खरंच काम करतंय का? ड्रायव्हरने दिलेल्या उत्तराने बसेल धक्का, VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT