Sambhaji Bhide Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Bhide News: तो आवाज कुणाचा? व्हाइस सॅम्पल घेणार, संभाजी भिडेंना ८ दिवसांत पोलीस ठाण्यात बोलावलं

Amravati News: तो आवाज कुणाचा? व्हाइस सॅम्पल घेणार, संभाजी भिडेंना ८ दिवसांत पोलीस ठाण्यात बोलावलं

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Sambhaji Bhide News: अमरावती येथे २७ जुलै रोजी येथील महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविण्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे.

संभाजी भिडे यांना ८ दिवसात अमरावती पोलीसाकडे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. भिडे यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ८ दिवसात संभाजी भिडे अमरावती पोलीसाकडे हजर राहतात का? याकडे लक्ष लागलं आहे.

तर याच संदर्भात राज्यात ज्या ठिकाणी भिडेवर गुन्हे दाखल झाले, त्या ठिकाणचे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली

दरम्यान, संभाजी भिडे यांनी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १० या कालावधीत एका मंगल कार्यालयात उद्बोधन केले होते. त्या दरम्यान त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले. तथा महापुरुषांची बदनामी केली. (Latest Marathi News)

या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडेे (रा. सांगली), निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT