Hasan Mushriff, Samarjeet Ghatge, Kagal, Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics : भाजप नेत्याने काेल्हापूरच्या पालकमंत्र्यांना भरला दम (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Samarjeet Ghatge Vs Hasan Mushrif : मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, त्यांच्याशी संघर्ष अटळ आहे असे मत भाजप नेते समरजितसिंह घाटगे (samarjeet ghatge latest marathi news) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. दरम्यान काेल्हापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif guardian minister of kolhapur) यांना घाटगेंच्या मतांवर बाेलणं टाळले. (Latest Marathi News)

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाले आहेत. या मुळे भारतीय जनता पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यात काटे की टक्कर होती. राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेल्याने हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला गेला आहे.

सन 2024 मध्ये कागलचा आमदार कोण ? यावरून कागल मध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. गेली दोन ते तीन महिने पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये काहीच अलबेल नव्हतं हे स्पष्ट होतं.

अजित पवार गटाची नाराजी दूर करत अजित पवार यांच्या गटाला पालकमंत्री पद देत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला खरा मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आता चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे.

हसन मुश्रीफांना घाटगेंना भरला दम

अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषता कागल तालुक्यातील भाजप नेत्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यात आता पालकमंत्री पद पुन्हा हसन मुश्रीफ यांनाच मिळाल्याने भाजप नेते घाटगे चांगलेच संतापले आहेत.

त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांनाच दम भरला आहे. ते म्हणाले भाजपच्या मेहेरबानीमुळे त्यांना पालकमंत्री मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या चाैकटीत राहूनच त्यांनी काम करावे. जेव्हा ते चाैकट पार करतील. तेव्हा त्यांनी मी चाैकटीत ठेवायचे काम करेन.

हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे ईडीच संकट उभं राहिलं होतं. त्यावेळी घाटगे यांनाच या पाठीमागचा सूत्रधार आहे असं म्हटलं जात होतं. अचानक हसन मुश्रीफ यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं. यावेळी देखील समरजीतसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात वाकयुद्ध चांगलंच रंगलं होतं. आता थेट कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हसन मुश्रीफ यांनाच मिळाल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे.

हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया देणे टाळलं

समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रतिक्रिया संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साम टीव्हीशी बाेलणे टाळले, त्यांनी केवळ हात जोडून नमस्कार करत घटनास्थळावरुन निघून गेले.

तटकरे म्हणाले...

हसन मुश्रीफ यांनी जरी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली असली तरी, समरजीतसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र उत्तर दिले आहे. एकमेकांच्या सहकार्याने सरकार बनत असते. याआधी ही असेच सरकार बनले आहे.

दरम्यान भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना पराभूत करूनच कागल मतदारसंघातून विजय मिळवेन असे जाहीरपणे सांगितले होते. आता हा विजय तितका सुखकर होईल का ? हे मात्र येणाऱ्या निवडणुकीतच कळेल

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT