Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवार भाजपला देणार सर्वात मोठा धक्का; विधानसभापूर्वी बडा नेता तुतारी फुंकणार?

Sharad Pawar Assembly Election News Updates Bjp: शरद पवार भाजपला देणार सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभापूर्वी कोल्हापुरातील बडा नेता तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. या पक्ष प्रवेशामुळे कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरात शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरच्या कागलमधील भाजप नेते समरजित सिंह घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समरजित सिंह घाटगे हे महाविकास आघाडीकडून कागलमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. घाटगे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसह मंत्री हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व नेत्यांनी विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार गटाकडून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ असल्याने समरजीत सिंह घाटगे यांची नाराजी उघड झाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे समरजित सिंह घाटगे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणार असल्याचे बोललं जात आहे. यासाठी समरजीत सिंह घाटगे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी समरजित सिंह घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबतचा दावा फेटाळला होता. मात्र, त्यांनी अपक्ष लढण्याबाबत विधानसभा निवडणूक लढण्याचे विधान केले होते. कागलमधील महायुतीमधील उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीत वाद रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केल्यास अजित पवार गटाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT