Sakal Saam Survey Saam Tv
महाराष्ट्र

Sakal Saam Survey: मुख्यमंत्रिपदासाठी 2024 मध्ये जनतेची पसंती कोणाला? सर्व्हेतून समोर आली शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारी माहिती...

मुख्यमंत्रिपदासाठी 2024 मध्ये जनतेची पसंती कोणाला? सर्व्हेतून समोर आली शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारी माहिती...

Satish Kengar

Sakal Saam Survey: शिवसेना पाठोपाठ दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींचा आगामी निवडणुकीवर परिणाम होणार का? 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनता आपला कौल कोणाच्या बाजूने देऊ शकते?

तसेच मुख्यमंत्रीपदासाठी जनतेची पहिली पसंती कोणाला आहे? याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही न्यूज यांनी राष्ट्रवादी Next 'महासर्वेक्षण' (Sakal-Saam Survekshan) केलं आहे.

कसं करण्यात आलं सर्वेक्षण?

हे सर्वेक्षण राज्यातील सगळ्या मतदार संघात करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्या लिंगाचे म्हणजे स्त्री-पुरुष आणि सगळ्या वयोगटातील मतदारांचा समावेश आहे. यात राज्यातील 73 हजार नागरिकांनी भाग घेतला आहे. (Latest Marathi News)

राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की, आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवणार. मात्र जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे, हे मतदारांनी या सर्वेक्षणात स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी 2024 च्या निवडणुकीत आपण कुणाला पसंती द्याल?

या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी 2024 च्या निवडणुकीत आपण कुणाला पसंती द्याल? असं विचारण्यात आलं होतं. यात 8.5 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे. तर 21.9 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दर्शवली आहे. यातच उद्धव ठाकरे यांना तब्बल 19.4 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली असून अजित पवार यांना 9.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

तसेच बाळासाहेब थोरात यांना 4.2 टक्के, अशोक चव्हाण यांना 6.6 टक्के, जयंत पाटील यांना 3.6 टक्के आणि 17.8 टक्के लोकांनी सुप्रिया सुळे यांना पसंती दर्शवली आहे. यातच 17.8 टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT