Dharashiv News, lokshahir annabhau sathe statue saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : रास्ता राेकाे आंदाेलनात दुचाकीस्वाराची एंट्री, कार्यकर्त्यांची धक्काबुक्की; पाेलीसांची मध्यस्थी

भर उन्हात आंदाेलकांनी रस्ता राेखून धरला.

Siddharth Latkar

- कैलास चाैधरी

Dharashiv News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा (lokshahir annabhau sathe statue) धाराशिव शहरात उभारला जावा या मागणसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आंदाेलन छेडलं जात आहे. या आंदाेलनाचा आज पाचवा दिवस आहे. (Maharashtra News)

आज आंदाेलकांनी त्यांच्या मागणीसाठी लहुजी वस्ताद साळवे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर सर्व आंदाेलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडला.

यावेळी आंदाेलकांनी (aandolan) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवा अन्यथा खूर्च्या खाली करा अशा घाेषणा दिल्या. दरम्यान शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात एक दुचाकीस्वार शिरला. त्याने आंदाेलकाचे कडे असलेल्या रिकाम्या जागेतून वाहन काढले.

त्यामुळे आंदाेलक संतपाले. त्यातील काहींनी दुचाकीस्वाराला फटकाविले. त्यातून वाद झाला. घटनास्थळावरील पाेलीसांनी आंदाेलकांना बाजूला करीत वाहनधारकाची सुटका केल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची यंदाच्या वर्षीची थीम काय आहे?

भाजी करपली? फेकून देऊ नका, दह्याची ही सोपी ट्रिक वापरून बघा

Gopalgad Fort : शिवकालीन पराक्रमाचा वारसा! गोपाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, अरबी समुद्राचा अद्भुत नजारा पाहून भारावून जाल

Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

SCROLL FOR NEXT