Vikroli Assembly SaamTv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Vikroli Assembly : विक्रोळी मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार विक्रोळी मतदारसंघात ठाकरे गटाचं पारड भारी पडताना दिसत आहे.

Saam Tv

विक्रोळी मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत रंगत आहे. याठिकाणी ठाकरे गटाने सुनील राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाकडून सुवर्णा करंजे यांना उमेदवारी मिळाली आहे.

सकाळच्या एक्झिट पोलनुसार विक्रोळी मतदारसंघात ठाकरे गटाचं पारड भारी पडताना दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी संभाव्य आमदार म्हणून सुनील राऊत यांना पसंती मिळत आहे. सुनील राऊत हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेत संघर्ष असताना देखील मंतदारांकडून संभाव्य आमदार म्हणून राऊत यांच्या नावाची चर्चा होत आहे.

विक्रोळी हा मुंबईतला अतिशय महत्वाचा मतदारसंघ समजला जातो. याठिकाणी ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसे अशी लढाई आहे. विक्रोळीमध्ये प्रचाराच्या सगळ्या महत्वाच्या सभा झाल्या. ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी या ठिकाणी सभा घेतली होती. तर शिंदे गटाच्या उमेदवारासाठी स्वत: एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील दोनवेळा या मतदारसंघात प्रचार सभा झाली.

ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील राऊत हे संजय राऊत यांचे भाऊ आहेत. त्यांनी विक्रोळी मतदारसंघात चांगली कामं केलेली आहेत. त्यामुळे मतदारांचा कौल त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT