विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दापोली मतदारसंघ महत्वाचा आहे. याठिकाणी रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं होतं. आता याच दापोली मतदारसंघात शिंदे गटाचे योगेश कदम यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळत आहे.
दापोलीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात लढत होत आहे. ठाकरे गटाकडून संजय कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शिंदे गटाने विद्यमान आमदार योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार दापोलीच्या मतदारांनी योगेश कदम यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती दिली आहे. निकाल उड्या जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी दापोलीत संभाव्य आमदार म्हणून योगेश कदम यांच्या नावाची चर्चा होत आहे.
दापोली मतदारसंघात पर्यटनाचा विषय महत्वाचा राहीला आहे. त्यादृष्टीने योगेश कदम यांनी केलेला विकास हा मुद्दा बघता याचा फायदा त्यांना विधानसभेत होणार आहे. दुसरं म्हणजे या भगत कुणबी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांची मतं कोणाला जातात, यावर देखील विधानसभेचा निकाल ठरणार आहे.
उबाठाचे संजय कदम यांनी जरी या ठिकाणी कडवी झुंज दिलेली असली तरी योगेश कदम हेच विजयी होतील असं मतदारसंघातील जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्या कोणाचा विजय होतो, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.