Kagal Assembly SaamTv
महाराष्ट्र

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Kagal Assembly : ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या समरजित घाटगे यांच्या कागल मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार गट अशी लढत रंगली आहे.

Saam Tv

कागल मतदारसंघ यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चर्चेत राहिला आहे. याठिकाणी समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ असा सामना येथे रंगला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच समरजित घाटगे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने इथे भाजपला धक्का बसला होता. तर याच पक्षप्रवेशाचा फायदा कुठेतरी मविआ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला होताना दिसत आहे.

सकाळच्या एक्झिट पोलमधून शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांना संभाव्य आमदार म्हणून मतदारांची पसंती मिळत आहे. त्यामुळे कागल मतदारसंघात शरद पवार यांच पारड जड असल्याचं बघायला मिळत आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी दुरंगी लढत या मतदार संघात बघायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून हसण मुश्रीफ यांना उमेदवारी मिळालेली आहे.

समरजित घाटगे हे भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली. त्यामुळे घाटगे नाराज होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपला रामराम ठोकल्याने भाजपला हे मोठं खिंडार या ठिकाणी पडलं. राज्यातल्या चुरशीच्या लढतीत कागल मतदारसंघाचा समावेश आहे. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ मंत्री आहेत. तरी देखील त्यांना कुठेतरी पराभव स्वीकारावा लागणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे.

समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार यांनी याठिकाणी सभा घेतली होती. तर शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी देखील भावासाठी सभा घेत समरजित घाटगे यांचा प्रचार कागलमध्ये केलेल्या दिसला. यावेळी मतदारांना भावनिक साद घालत त्यांनी समरजित घाटगे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. त्याचाच परिणाम आता एक्झिट पोलमध्ये बघायला मिळत असून घाटगे यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळत असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT