सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटक करण्यात आलेला आरोपी एकच नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. कुणी केलाय हा दावा आणि काय आहे नेमकं सत्य? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
सैफअली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खळबळ माजली. हल्लेखोर आरोपीचे सीसीटिव्ही समोर आले आणि आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना झाली. मोठा गाजावाजा करत पोलिसांनी 2 दिवसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं ठाण्यातून आरोपी बेड्या ठोकल्या. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मात्र सैफच्या घरातून बाहेर पडतानाच्या सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी हे दोघे वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आलाय. अटकेत असलेल्या बांग्लादेशी आरोपीचे वडील रुहेल अमीन फकीर यांनी एबीपी न्यूजवर केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आरोपीच्या वडीलांनी नेमका काय दावा केलाय. पाहूया..
अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा
सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा माझा मुलगा नाही
ज्याला अटक केली आहे तो माझा मुलगा
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा वेगळा
शहजादने केस कापले तरी मी त्याला ओळखेन
आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बचावासाठी असा दावा केल्याचं गृहीत जरी धरलं तरी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सैफवर खरंच हल्ला झाला का? असा सावलच त्यांनी केलाय. य़ामुळे मात्र भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आलीय.
सैफवरील हल्ल्याबाबत सुरूवातीपासूनच वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी नेतेच या हल्ल्यावर संशय व्यक्त करत असल्यामुळे काहीतरी काळगोरं आहे की काय अशी शंका येणं स्वाभाविक आहे. त्यात आता आरोपीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे नवा ट्विस्ट आलाय. जर सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटकेत असलेला आरोपी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती नसतील तर पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.