Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Chhatrapati Sambhajinagar Sai College News : छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांकित कॉलेजने २०० विद्यार्थ्यांची फी घेतली असूनही हॉलतिकीट न दिल्याने परीक्षा अडली. व्यवस्थापक फोन बंद करून बसले असून विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • नामांकित कॉलेजने फी घेतली पण हॉलतिकीट दिले नाही

  • २०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

  • व्यवस्थापक संपर्कात नसल्याचा आरोप

  • विद्यार्थ्यांचा रात्रीपासून ठिय्या सुरू

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित इन्स्टिट्यूटकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. शहरातील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचे फी भरून देखील हॉलतिकीट दिलं नसल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन बंद केले आहेत. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कालपासून कॉलेजमध्ये ठिय्या मांडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची आज परीक्षा होती. या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच हॉल तिकीट देणे बंधनकारक होत. मात्र या इन्स्टिट्यूटमधील २०० विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आलेलं नाही. या वेळी तुमच्या कॉलेजने परीक्षा शुल्कच भरले नसल्याने हॉलतिकीट मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचे विद्यापीठाने सांगितले पण मुलांना मिळाले . शिवाय विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन बंद केले असल्याचं विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी म्हटले आहे. यानंतर मुलांनी परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न मुलांना आणि त्यांच्या पालकांना भेडसावत आहे. परिक्षा संदर्भात सर्व अर्ज व फिस कॉलेजमध्ये जमा केली असुन कॉलेज परिक्षेकरीता हॉल टिकीट देत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर २०० विद्यार्थ्यांनी काल पासून कॉलेजमध्ये ठिय्या मांडला आहे. धक्कादायक म्हणजे आज परीक्षा घेणे शक्य नसल्याचं कॉलेज कडून विद्यार्थ्यांना व्हाट्सअँप मेसेजद्वारे सांगण्यात आले आहे. शिवाय आता एकाच वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा एकत्र द्या असे देखील सांगण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीतून मोटार काढताना विपरीत घडलं; शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू, धाराशिवात हळहळ

Hair Care: केमिकल्सचे प्रॉडक्टने केस खराब झालेत? आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरायला, केस होतील नॅचरली सॉफ्ट

Glowing Skin Tips: पार्लरला जायची गरज नाही! देसी नुसका वापरा अन् चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो मिळवा

Baramati : १० हजारांचा हप्ता दिला नाही; गावगुंडांकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

Eyebrow Growth: पातळ आयब्रोमुळे चेहऱ्याची शाईन गेलेय? या २ उपायांनी होईल चमत्कार, तुम्हीच दिसाल उठून

SCROLL FOR NEXT