Sadanand Kadam Saam TV
महाराष्ट्र

Sadanand Kadam: मोठी बातमी! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ४ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dapoli Sai Resort Scam: राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत असून माजी मंत्री व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) ने अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं व संशयास्पद खरेदी-विक्रीचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विद्यमान आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज सर्च ऑपरेशन साठी गेलं होत. त्यानंतर कदम यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे.

अनिल परबांच्या अडचणीत वाढ...

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच कदम यांना ईडीनं आज सकाळी त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ असले तरी ते अनिल परब (Anil Parab) यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या अटकेमुळं अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खेडच्या सभेसाठी सदानंद कदम यांनी पडद्याआडून जोरदार ताकद लावल्याची चर्चा होती. सभेनंतर चारच दिवसांनी इडीची कारवाई झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT