Sadanand Kadam Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri News: रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्टप्रकरणी मोठी कारवाई

ED Action : दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकेत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. (Latest News)

साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ईडीने आज सदानंद कदमांना अटक केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

Maharashtra Live News Update: पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा यलो (Heat Wave) अलर्ट

Crime: घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचं कारमधून अपरहण, गुंगीचे औषध देऊन बलात्कार

लग्न समारंभातून परतत असताना भल्या पहाटे वऱ्हाडी लोकांवर काळाचा घाला; चालकाची एक चूक अन्... अपघाताची थरारक घटना

Shocking : सासूने सुनेला बॉयफ्रेंडसोबत बेडवर नको त्या अवस्थेत पाहिलं; नंतर भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT