Eknath Shinde and Sachin Ahir address media after Ahir joins Shinde-led Shiv Sena, hinting at further political shifts. saam tv
महाराष्ट्र

सचिन आहिर यांच्यानंतर ठाकरेंचे आणखी आमदार फुटणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं ऑपरेशन टायगर ३

Maharashtra Politics More Mlas To Quit Thackeray Camp: सचिन अहिर यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर ठाकरे गटातील आणखी आमदार फुटणार का? एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर 3’ सूचनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

काल पर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आणि आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून फिरणारे आमदार सचिन आहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यान आज सकाळी आश्चर्याचा धक्का राजकीय वर्तुळात दिला. ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर सचिन आहिर हे कालपर्यंत त्यांच्यावर टीका करत होते. तर तिकडे उद्धव ठाकरे यांनी त्या 6 मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यालाच सचिन आहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत षटकार मारला असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

तर पक्षप्रवेश झाल्यानंतर सचिन आहिर आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि सचिन आहिर यांनी आपली भूमिका जाहीर केली. एकनाथ शिंदे म्हणाले, आज सचिन आहिर यांनी षटकार मारला आहे. सहा खासदारांनी आधीच षटकार ठोकले होते. आता सहा मतदारसंघातही बदल दिसून येत आहेत. सचिन अहिर यांनी षटकार मारला. चौकार आणि षटकारांची ही मालिका सुरूच राहील. समोरच्यांच्या एकेक विकेट पडत राहील, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

तसेच खासदार फुटीनंतर राज्यात आमदार फुटीची चर्चा सुरू झाली होती. ऑपरेशन टायगर 3.O मध्ये उद्धव ठाकरे यांचे आमदार देखील शिंदे गळाला लावणार आहे असे बोलले जात असताना एकनाथ शिंदे यांनी देखील एक प्रकारे मोठे संकेत दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना विधानसभेचे आमदार संपर्कात आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शिंदे म्हणाले, आज सगळं सांगितलं तर ब्रेकिंग कशी मिळेल।... अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT