saamana editorial on congress Saam Tv
महाराष्ट्र

"काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कोठे लावायचे?"

शिवसेनेनं (ShivSena) काँग्रेसला लागलेल्या या गळतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: एकीकडे भाजपने (BJP) आगामी 2024 लोकसभा निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागल्याचं चित्र दिसत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. दुसरीकडे हार्दिक यांच्यानंतर पंजाबमधील कॉंग्रेस नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी? असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून (Saamana Editorial) उपस्थित करण्यात आला आहे.

गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड ही दोन नावं काँग्रेस सोडून जाणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या यादीत नव्याने शामील झाली आहे. आता शिवसेनेनं (ShivSena) काँग्रेसला लागलेल्या या गळतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून कॉंग्रेसवर काही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत, तसेच काही सल्लाही देण्यात आला आहे.

"ठिगळ तरी कोठे लावायचे?"

काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळय़ांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे. अशी चिंता सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.

"यावर चिंतन करण्याची वेळ"

“पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाला काही सवाल केले. ‘‘मी पंजाब आणि राष्ट्रहिताचेच बोलत होतो, पण त्यावर काँग्रेसने मला ‘नोटीस’ देऊन काय साध्य केले?’’ हा त्यांचा मुख्य सवाल आहे. काँग्रेसने माझा राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाखड करतात,” असा उल्लेख लेखात आहे.

"हे नेतृत्वाचेही अपयश"

माधवराव शिंदे, जीतेंद्र प्रसाद आणि बलराम जाखड या तिन्ही नेत्यांना काँग्रेसने भरभरुन दिले. त्यांच्या मुलांचेही कल्याण करण्यात काँग्रेसने कधी हात आखडता घेतला नाही. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद आणि सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठ्या निघाल्या. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी काँग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

"एका सिद्धूसाठी काँग्रेसने पंजाब गमावले"

ज्या राज्यांत आता निवडणुका आहेत, त्या राज्यांत जनसंपर्क असलेल्या नेत्यांना तरी काँग्रेसने सांभाळले पाहिजे. एका नवज्योत सिद्धूसाठी काँग्रेसने पंजाब राज्य हातचे गमावले. तो सिद्धूही आता जेलमध्ये गेला आणि सिद्धूला अवास्तव महत्त्व मिळाले म्हणून जुनेजाणते जाखडही गेले. हार्दिक पटेल हा तरुण नेता काँग्रेसमध्ये आला तेव्हा गुजरात काँग्रेसला बहार येईल असे वाटले होते, पण हार्दिकला राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामच करू दिले जात नव्हते. असा उल्लेखही अग्रलेखात करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT