Maharashtra Exit Polls :  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls : लातूर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Saam exit poll, latur city assembly constituency : लातूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड असण्याची शक्यता आहे. लातूरमधील अमित देशमुख संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

लातूर : विधानसभा निवडणुकीचं मतदान बुधवारी पार पडलं आहे. या मतदानानंतर आता साऱ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे लोकांचं विशेष लक्ष असणार आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. अमित देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून लातूर शहराचं प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाही अमित देशमुख यांचं नाव संभाव्य आमदार म्हणून समोर म्हणून पुढे आलं आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अर्चना चाकुरकर या रिंगणात होत्या. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच गड हे अमित देशमुख हेच राखण्याची शक्यता वर्तवली आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची लढत चुरशीची पाहायला मिळाली. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित देशमुख यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली. अमित देशमुख हे यंदा चौथ्यांदा मतदारसंघाच्या रिंगणात होते. या मतदारसंघात भाजपकडून नवा चेहरा मतदारसंघातून देण्यात आला होता. अर्चना चाकुरकर या माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चाकुरकर यांच्या सूनबाई आहेत.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघात ताकद लावली होती. वंचितने या मतदारसंघात विनोद खटके यांना उमेदवारी दिली होती. शहरी भागात भाजपला मोठं मतदान झालं आहे. तर या मतदारसंघातील २७ गावे आहेत. या गावातून काँग्रेसला मोठं मतदान झालं आहे. एकूण या मतदारसंघात थोड्या फार फरकाने अमित देशमुख विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT