Kharadi Rave Party Pranjal Khewalkar Rupali Chakankar Saam Tv
महाराष्ट्र

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Kharadi Rave Party Pranjal Khewalkar : रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात गेलाय. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनी चाकणकरांविरुद्ध राईट टू प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित केलाय. पाहूयात एक खास रिपोर्ट...

Shreya Maskar

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांविरोधात हे आरोप केलेत. पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी खेवलकरांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात रोज नवेनवे खुलासे केले जात आहेत. अशातच महिला आयोगाच्या चाकणकरांनी खेवलकारांवर गंभीर आरोप केलेत. मानवी तस्करी केल्यानं याप्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही चाकणकरांनी केलीय..

दरम्यान रुपाली चाकणकरांनी जाहीररित्या प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल डेटाची माहिती दिल्यानं सुप्रिया सुळेंनी 'राईट टू प्रायव्हसी'चा मुद्दा मांडत, चाकणकरांकडे खेवलकरांचा मोबाईल डेटा कसा आला? असा सवाल उपस्थित केलाय.

न्यायालयाच्या नियमानुसार, आरोपीचा मोबाईल डेटा कोर्टात सादर करण्याची परवानगी फक्त पोलिसांना असते. त्यामुळे इतर कोणालाही हा डेटा देता येत नाही. अशावेळी चाकणकारांनी मोबाईल डेटाची माहिती थेट पत्रकार परिषदेत दिल्यानं काही कारवाई होणार का? पोलिस यंत्रणेनं हा महत्त्वाचा डेटा चाकणकरांना का दिला? प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंची पती असल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. आरोप- प्रत्यारोप सुरु असताना चाकणकरांच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT