Rupali Chakankar Defamation Row: Case Registered Against 19, Including Dipali Syed and Sushma Andhare saam tv
महाराष्ट्र

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर बदनामी प्रकरण; दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल

Rupali Chakankar Defamation Case : रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली सय्यद, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात एकूण १९ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • दिपाली सय्यद, सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांच्यासह इतरांची नावे गुन्ह्यात

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

पुण्यात गुन्हा दाखल

भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर या खरातच्या संपर्कात असल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. या प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आले असून आपली बदनामी झाल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला होता.

त्यांची बदनामी केल्याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून आज १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या सर्वांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची ९ वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मी तिथे जात होती. १८ मार्च २०२६ रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे प्रसार माध्यमांमधून समजले. त्यानंतर खरात यांच्यासोबत सामाजिक कार्यक्रमातील फोटो वापरून माझ्यावर आरोप करण्यात आले.

२० मार्च २०२६ रोजी सोशल मीडिया तपासताना १९ फेसबुक / इंस्टा / युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकण्यात आलेत. या सर्वांची नावे आणि पोस्टचे स्क्रीनशॉट चाकणकर यांच्याकडून पोलिसांना देण्यात आले. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT