Lokshahi Marathon Saam Tv
महाराष्ट्र

Lokshahi Marathon: मतदार जनजागृती मोहीम, कोल्हापुरात रन फॉर वोट ‘लोकशाही मॅरेथॉन’चे 7 एप्रिल रोजी आयोजन

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने 7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत “RUN FOR VOTE” या "लोकशाही मॅरेथॉन" चे आयोजन करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News:

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत “RUN FOR VOTE” या "लोकशाही मॅरेथॉन" चे आयोजन करण्यात आले आहे.

“चला धावू या – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी” हे या लोकशाही मॅरेथॉनचे ब्रीद वाक्य असणार आहे. कोल्हापूर शहरामधील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची जन जागृती, करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 7/4/2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे लोकशाही मॅरेथॉन होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या लोकशाही मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना 3 कि.मी, 5 कि.मी, 10. कि.मी. अंतराचे पर्याय उपलब्ध होणार असून या मॅरेथॉनची सुरुवात व सांगता पोलिस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. या वोट मॅरेथॉनमध्ये कोल्हापूर शहरातील विविध शासकीय, निम शासकीय, महामंडळे, राष्ट्रियीकृत बँका व सहकारी बँका, संस्था कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मतदार नागरिक यांनी मोठ्या संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे तसेच, जे मतदार सहभागी होऊ शकणार नाहीत, त्यांनीदेखील धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.  (Latest Marathi News)

या लोकशाही मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून 24/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीमध्ये https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9 या लिंकवरती धावपटू नि:शुल्क नोंदणी करु शकतील ,असे आवाहन निलकंठ करे, नोडल अधिकारी (स्वीप) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT