उदय सामंत Saam Tv
महाराष्ट्र

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करणार : उदय सामंत

सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनींची सुरक्षितता महत्वाची असून त्यासाठी सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनींची सुरक्षितता महत्वाची असून छेडछाडमुक्त, सायबरमुक्त परिसर राहिण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थींनीच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांचे, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. 90 दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी.

हे देखील पहा :

यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेश अशी नियमावली तयार करावी. ही नियमावली खासगी महाविद्यालये, विद्यापीठांनासुद्धा लागू राहील. तसेच विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे. संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थींनी, त्यांचे पालक यांचा समावेश असेल यामुळे या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होईल, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितिन करमळकर, नागपूर विद्यापीठाचे संचालक डॅा.सोपानदेव पिसे, अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॅा.भाले, डॅा.तुषार देशमुख नांदेड विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.भिसे, कुलसचिव डॅा.खंदारे, सोलापूर विद्यापीठाचे संचालक डॅा.वसंत कोरे,मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॅा. सुधीर पुराणिक, कोल्हापूर विद्यापीठ कुलसचिव डॅा. वि.एन शिंदे, कुलगुरू डॅा.डि.टी शिर्के, संचालक डॅा. आर.वी. गुरव, गडचिरोली विद्यापीठाचे डॅा.प्रशांत बोकाडे, जळगाव विद्यापीठाचे संचालक डॅा.पंकज ननावरे उपस्थित होते.

तसेच, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ सुधारणा समिती सदस्य शितल देवरुखकर-शेठ, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे, मुंबई विद्यापीठ WDC चे पंड्या मॅडम, युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे, युवासेना कार्यकारणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे याबैठकीत उपस्थित होते. बैठकीमध्ये कुलसचिव, महिला सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संघटनांचे महिला प्रतिनिधी यांनी विद्यार्थींनींच्या अडचणी, तक्रारींनंतर मिळणारा प्रतिसाद, महाविद्यालयांची कार्यवाही, महाविद्यालयीन परिसरात सीसीटीव्ही, स्थानिक पोलीस प्रशासनाचा प्रतिसाद, महाविद्यालयांमध्ये सुरक्षिततेबाबत केलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

IPLच्या सुरुवातीला घडली भयंकर घटना; स्पर्धेतील महत्त्वाच्या व्यक्तीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Heart attack symptoms: रात्री झोपेत छातीत अचानक वेदना होतात? दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT