Nylon Manja saam tv
महाराष्ट्र

Makar Sankranti 2024 : नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संभाजीनगर महापालिकेची धडक कारवाई; 70 हजार रुपयांचा मांजा जप्त, घरासह दुकान सील

मकर संक्रात निमित्त पंतग उडविण्यासाठी देशभरातील युवा वर्ग सज्ज झाला आहे.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhaji Nagar News :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नायलॉन मांजा विक्री करणा-यांना जरब बसावी यासाठी मांजा विक्रेत्यांवर कठाेर कारवाईस प्रारंभ केला आहे. संभाजीनगर महापालिकेच्या पथकाने मांजा विक्रेत्यांच्या दुकानावर धाड टाकत 70 हजार रुपयांचा बंदी असलेला मांजा जप्त केला आहे. तसेच विक्रेत्याचे घर आणि दुकान सील केल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे. (Maharashtra News)

मकर संक्रांत (makar sankranti 2024) निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे युवा वर्गाची पंतग उडवण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पतंगाची दुकाने लागली आहेत. तसेच मांजाचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत.

नायलॉन मांजा आणि चायना मांजा अशा विविध प्रकारच्या मांजामुळे राज्यभरात नेहमीच छाेट्या माेठ्या दुर्घटना घडल्याचे आपल्या कानावर पडते. त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी देखील आणली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलाॅन माजांचा वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच दिलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

70 हजार रुपयांचा मांजा जप्त

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पथकाने नायलॉन मांजा विक्री अथवा तयार हाेत असलेल्या ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. महापालिकेच्या पथकाने 27 मीटर मांजा जप्त केला. तसेच मांजा विक्रेत्याचे घर आणि दुकान सील करून विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुमारे 70 हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT