Rohit Pawar News saam tv
महाराष्ट्र

...मग त्यावेळी विरोधक का शांत होते; रोहित पवार यांचा सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर राडा करणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष केलेय.

मंगेश कचरे

बारामती : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर राडा करणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लक्ष केलेय. राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते.

माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास गरज आहे. शाहू, फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे त्यामुळे आपण लढतो. पण सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे.

टिकली चे प्रकरण राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर झालं, खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन एका मंत्राने वक्तव्य केलं, ते सुद्धा राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर झालं. जितेंद्र आव्हाड यांना जेलमध्ये टाकले. त्यानंतर त्यांच्यावर वेगळी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. खासदार संजय राऊत हे बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना काही संघटना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतरच का घडत आहेत? असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला पडला आहे असे देखील रोहित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

SCROLL FOR NEXT