Devendra Fadnavis And Rohit Pawar Saam TV
महाराष्ट्र

'रोहित पवारांचं वक्तव्य बरोबर, देवेंद्र फडणवीस हे तरुण नेते आहेत'

'२०२४ नंतर तरुणांना निर्णय घ्यावे लागतील शरद पवार, अजित पवार हे मार्गदर्शन करतील.'

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : रोहित पवार यांचे वक्तव्य बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तरुण नेते आहेत आणि येत्या काळात तेच योग्य निर्णय घेतील असं वक्तव्य अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे.

ते कर्जत येथे गोदड महाराजांच्या रथयात्रोत्सवाला आले असता ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचही खासदार डॉ. सुजय विखे (MP Dr Sujay Vikhe) म्हणाले.

काल पनवेलमधील भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यकरणीची बैठकीत बोलताना 'आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं', असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. यावर बोलताना विखे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना तसं म्हणायचं नव्हतं, तर ज्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा झाली तेंव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना ते अपेक्षित नव्हतं.

पाहा व्हिडीओ -

मात्र, पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आताच काय तर पुढचा पाच वर्षाचा देखील कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास देखील विखे यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, २०२४ नंतर तरुणांना निर्णय घ्यावे लागतील शरद पवार, अजित पवार हे मार्गदर्शन करतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं होतं, त्यावर बोलताना सुजय विखे म्हणाले की, रोहित पवारांचं वक्तव्य बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस हे तरुण नेते आहेत आणि येत्या काळात तेच योग्य निर्णय घेतील असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT