Three youths killed in bike-truck accident near Khamgaon saam tv AI
महाराष्ट्र

संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतताना अनर्थ घडला; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Bike -Truck Accident: खामगावजवळ मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर दुचाकी आणि ट्रकच्या धडक झाली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Bharat Jadhav

  • बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ भीषण रस्ते अपघात.

  • मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर दुचाकीची ट्रकला धडक

  • अपघातात जळगाव जिल्ह्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू.

संजय जाधव, साम प्रतिनिधी

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर खामगावजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव दुचाकीने ट्रकला जोरदार धडक दिल्याने या दुर्घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही तरुण शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. यावेळी खामगावजवळ त्यांच्या दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात दिगंबर चंद्रकांत इंगळे (वय ३२, रा. हरणखेड, ता. मलकापूर), मयूर निवास होले (वय २४, रा. हरणखेड) आणि परेश सुरेश घुले (वय १७, रा. घाणखेड, ता. बोदवड, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला

बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात घडला. यात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. या दुर्घटनेनंतर स्थानिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ​

ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमित शाहांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा! 1500 कोटींचे पॅकेज; टॅक्सीचालकांसाठी ही घेतला निर्णय

संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू? सरकार कोणते विधेयक मांडणार?

Maharashtra News Live Update: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात एनडीआरएफ टीम दाखल

विलिनिकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! चार दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार; राजकारणात खळबळ

Natasha Awhad:डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; आव्हाडांच्या पोस्टनं खळबळ

SCROLL FOR NEXT