Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका वाढला; अंगाची अक्षरश: लाहीलाही, सर्वाधिक तापमान कुठे?

Maharashtra Weather update : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याचं दिसत आहे. यामुळे नागरिकांची अंगाची अक्षरश: लाहीलाही झाली आहे. राज्यात सर्वाधिक तापमान कुठे? जाणून घ्या.

Vishal Gangurde

राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. राज्यातील कमाल तापमााचा पारा ३६ अंशापार पोहोचला आहे. सोमवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी हरियाणाच्या रोहतक भागात देशाच्या सपाट भूभागावर निचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाडमधील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं दिसून आलं. तर उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते २२ अंशाच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तपामानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत सोलापूरसहित मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर , वर्धा या भागात कमाल तापमान ३६ अंशावर होतं.

राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. उकाड्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज कमाल आणि किमान तापमानात १ ते २ अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीये. तापमानातील बदलामुळे लोकांमध्ये आजार बळावण्याची शक्यता

राज्यात कुठे किती होते तापमान?

जेऊर (३६.५-१४.५)

कोल्हापूर (३४.६-१९.५)

महाबळेश्वर (३१.२-१७.१)

पुणे (३५.८-१२.९)

अहिल्यानगर (३५.०-११.६)

धुळे (३५.०-११.०)

जळगाव (३४.७-१४.२)

मालेगाव (३३.२-१३.८)

नाशिक (३४.१-१३.६)

निफाड (३२.४-८.०)

अकोला (३६.७-१७.३)

सांगली (३६.३-१८.०)

सातारा (३५.२-१५.२)

सोलापूर (३७.४-१८.६)

अमरावती (३५.८-१५.३)

नागपूर (३६.५-१५.०)

वर्धा (३६.०-१५.८)

सांताक्रूझ (३५.९-१८.५)

डहाणू (३३.२-१७.५)

रत्नागिरी (३५.९-१८.५)

छत्रपती संभाजीनगर (३५.०-१६.६)

धाराशिव (३४.६-१५.६)

परभणी (३६.५-१७.१)

वाशीम (३३.४-२१.६)

यवतमाळ (३५.४-१६.०)

भंडारा (३४.८-१६.४)

बुलडाणा (३५.०-१६.८)

ब्रह्मपुरी (३७.२-१५.५)

चंद्रपूर (३६.४-१६.०)

गडचिरोली (३४.६-१६.०)

गोंदिया (३४.४-१५.४)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT