nandurbar, chandsaili ghat,  saam tv
महाराष्ट्र

Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन झालं जागं, चांदशैली घाटातील दरड प्रवण क्षेत्रात बांधल्या जाणार संरक्षण भिंती

राेषमाळ - धडगांव - तळाेदा रस्ता महिनाभर सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : दरडी काेसळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चांदशैली घाटात आवश्यक त्या उपयायाेजना हव्यात अन्यथा माेठी दुर्घटना घडू शकते असे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले हाेते. त्याची दखल देत प्रशासनाने तातडीने घाटात मोठ्या संरक्षण भिंती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महिनाभर हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणाला सातपुड्याचा दुर्गम भागाची जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून तळोदा धडगाव या मार्गाची ओळख आहे. या मार्गावर असलेल्या चांदशैली घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड प्रवण ठिकाण होते. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी डोंगरातून मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर येत होती तसेच दरीच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंती इतर कारणांनी पावसाळ्यात हा घाट धोकेदायक बनत होता.

या साऱ्या घटनेची बातमी साम टीव्हीने वेळोवेळी प्रसारित केली. प्रशासनाने बातमीची दखल घेत घाटात संरक्षण भिंत आणि दरडी काढण्याचे काम सुरू केले आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे प्रवाह डोंगरावरून खाली येत होते. त्या ठिकाणीही मोठ्या संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत.

महिनाभर राहणार मार्ग बंद

यासाठी राेषमाळ - धडगांव - तळाेदा रस्ता महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असल्याने या रस्त्यावरील वाहतूक येत्या काळात सुकर होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील गावातील नागरिकांचा फेरा वाचणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT