Beed: जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन ठरला! आंदोलन दिन... 
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन ठरला! आंदोलन दिन...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 12 आंदोलन सुरू

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये आज प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी, अनेक महिने आणि वर्षांपासून न्याय (Justice) मागूनही मिळत नसल्याने, आपल्या समस्या घेऊन न्यायाची मागणी करत, जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयासमोर तब्बल 12 आंदोलन सुरू आहेत. यामध्ये बीड (Beed) जिल्हा रुग्णालयामध्ये (hospital) झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करावी, वनविभागमध्ये (forest department) झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, शहिद जवानांच्या कुटुंबियांना जमिनीचे वाटप करावे, कोरोना (Corona) काळात रुग्णांना दिलेल्या जेवणाचे बिल मिळावे. (Republic Day Beed district Movement Day)

हे देखील पहा-

याच बरोबर गायरान जमीन नावावर करून द्यावी, पोलीस (Police) प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविषयी न्याय मिळावा, पारधी समाजातील कुटुंबीयांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर नगरपालिका (Municipality) कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून कायम सेवेत घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, धरणे आंदोलन, निदर्शने आंदोलन सुरू आहेत.

यावेळी नगरपालिका कर्मचारी (Employees) महिलेने शोले स्टाईल आंदोलन करत, आपली मागणी मांडली आहे. दरम्यान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आपल्या जिल्ह्यातीलच नागरिकांना न्याय देण्यात अपयशी ठरले असून त्यामुळेच आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, एवढ्या मोठ्या स्वरूपात हे 12 आंदोलन सुरू असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT